रहाणे-पुजाराचा खेळ खल्लास! टीम इंडियातून आली मोठी Update

(sports news) भारतीय टेस्ट टीमच्या सीनियर खेळाडूंच्या कामगिरीबाबत गेल्या काही काळापासून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) दक्षिण आफ्रिकेतल्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs South Africa) अपयशी ठरले. तसंच टीम इंडियाचा 2-1 ने पराभवही झाला. यानंतर आता टीम इंडिया घरच्या मैदानात श्रीलंकेविरुद्ध (India vs Sri Lanka) फेब्रुवारी-मार्च महिन्यात 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजसाठी भारतीय निवड समिती मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये (WTC) भारतीय टीम सध्या पाचव्या क्रमांकावर आहे.

इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना श्रीलंकेविरुद्धच्या (IND vs SL) सीरिजसाठी संधी मिळणार नाही. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिका सीरिजनंतर कोच राहुल द्रविड आणि नव्या कर्णधारासोबत चर्चा होईल. रहाणे आणि पुजारा यांच्यासाठी दरवाजे कायमचे बंद केले जाणार नाहीत. त्यांना स्थानिक क्रिकेट खेळायला आणि फॉर्म परत मिळवायला सांगितलं जाईल. स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून ते टीम इंडियात पुनरागमन करू शकतात.

रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy) सामने कोरोनामुळे स्थगित करण्यात आले आहेत, त्यामुळे रहाणे-पुजाराच्या पुनरागमनाला वेळ लागू शकतो. मागच्या 12 महिन्यात पुजाराने 14 मॅचमध्ये 24 च्या सरासरीने रन केले. जानेवारी 2019 नंतर पुजाराला शतक करता आलेलं नाही. तर रहाणेने मागच्या एका वर्षात 13 मॅचमध्ये 20 च्या सरासरीने रन केले. 10 वेळा तर त्याला दोन अंकी स्कोअरही करता आला नाही. (sports news)

रहाणे आणि पुजाराच्या अनुपस्थितीमध्ये शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारीला संधी दिली जाऊ शकते. गिलला तिसऱ्या क्रमांकावर तसंच अय्यर किंवा विहारीपैकी एकाला पाचव्या क्रमांकावर खेळवलं जाऊ शकतं. रोहित शर्माला (Rohit Sharma) टी-20 आणि वनडेनंतर आता टेस्ट टीमचं नेतृत्वही दिलं जायची शक्यता आहे. या रेसमध्ये केएल राहुल आणि ऋषभ पंतही आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *