बर्थडे पार्टीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार,नेत्याच्या मुलाला अटक

(crime news) बंगालच्या नादीया जिल्ह्यात नववीत शिकणाऱ्या मुलीवर वाढदिवसाच्या पार्टीत सामूहिक बलात्कार करण्यात आला, यात तिचा मृत्यू झाला असून, धमकावून तिचं अंत्यसंस्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणात टिएमसीच्या नेत्याला अटक करण्यात आलीय, ब्रजगोपाल उर्फ सोहेल गयली असं त्या स्थानिक नेत्याचं नाव आहे. पीडीत मुलगी या नेत्याच्या बर्थडे पार्टीत गेली होती.

तृणमूल कॉंग्रेसच्या पंचायत सदस्य असलेल्या ब्रजगोपाल याला पोलिसांनी अटक केलीय. पीडीतेच्या कुटुंबियांनी ब्रजगोपालवर संशय व्यक्त केला होता त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सोमवारी त्याला रनघर कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. हंसखली पोलिस स्टेशनला याविषयीची तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक रुपांकर सेनगुप्ता यांनी दिलीय. पार्टीतून आल्यानंतर मुलीला रक्तस्त्राव आणि प्रचंड वेदना होत होत्या, तिला दवाखान्यात घेऊन जाण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहीती पीडीतेच्या आईने सांगितलं. (crime news)

या घटनेनंतर भाजपाने ‘हंसखली’ येथे १२ तासांचा बंद पुकारलाय. यासंदर्भात TMC च्या नेत्या आणि महिला व बालकल्याण मंत्री शशी पंजा यांनी राज्य सरकारकडून अल्पवयीनांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारातील प्रकरणावर कोणाची हयगय केली जाणार नसल्याचं म्हणाल्या. या प्रकरणाचं राजकारण केलं जाऊ नये, पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *