कोल्हापूर : दिव्यांग खेळाडूंचाही उत्स्फूर्त सहभाग
स्पर्धेच्या जगात जीवन धावपळीचे बनले आहे. यामुळे लोकांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे. आरोग्य सुद़ृढ असेल तरच आपण काम करून स्पर्धेच्या युगात टिकू शकणार आहे. यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठीच्या जनजागृतीसाठी कोल्हापूर स्पोर्टस् क्लब व रगेडियन तर्फे गेल्या सहा वर्षांपासून ‘कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा ही स्पर्धा रविवार, दि. 24 एप्रिल रोजी होत असून याला भरघोस प्रतिसाद मिळला आहे. दिव्यांग खेळाडूंनीही पळण्याची जिद्द मनाशी बाळगत या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा निर्धार केला आहे.
धावण्याचे अनेक फायदे मानवी शरीरास नखशिखांत होतात. मेंदू, हाडे, विविध अवयव, हात-पाय यांचा चांगला व्यायाम होतो. स्नायूची चरबी कमी होते. सांध्यांच्या लवचिकतेत वंगण घालण्यास मदत मिळते. संप्रेरक उच्च वेगाने धावणे वाढीच्या हार्मोन्स आणि स्नायूंच्या विकासाची क्रिया सुलभ करते आणि हाडांच्या पुनर्प्राप्तीस गती देते. फुप्फुसे. डायफ्राम फंक्शन सुधारित करते. रोगप्रतिकार प्रणाली जोपर्यंत शारीरिक मागणीची पातळी वाढविली जात नाही तोपर्यंत रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. असे फायदे नियमित पळण्याने होतात. यामुळे लोकांना धावण्यासाठी प्रेरणा मिळावी, या उद्देशाने कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. यात सहभागी होण्याचे आवाहन कोल्हापूर स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण व रगेडियनचे आकाश कोरगावकर यांनी केले आहे.
मॅरेथॉनची रंगीत तालीम म्हणून गेल्या तीन रविवारी सहभागी स्पर्धकांसाठी प्रॅक्टिस रनचे आयोजन करण्यात आले होते. यात तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. केएसबीपी चौक शिवाजी विद्यापीठ येथे मॅरेथॉनची रंगीत तालीमच झाली. यात स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
नावनोंदणी व अधिक माहिती
स्पर्धेसाठी त्वरित नावनोंदणीसाठी ‘रगेड कब किड्स फिटनेस अॅकॅडमी’, तावडे लॉन मेमोरियल चर्चच्या मागे, सासने ग्राऊंड येथे दुपारी 4 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत नावनोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी www.kolhapurrun.com या संकेतस्थळावर किंवा 7776981548 / 7722067477 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.