हाॅटेलला धडक देत बस कारवर जाऊन आदळली

पुणे-नगर महामार्गावर एका कारचालकाला वाचविण्याच्या नादात, खासगी बस एकाया अपघातात हॉटेलचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचबरोबर पार्किंगमध्ये असणाऱ्या सुमारे पाच गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील गंभीर जखमींना पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हॉटेलला धडक देऊन, पार्क केलेल्या कारवर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघातात झाला. या अपघातात पार्क केलेल्या कारमधील कारचालक जागीच ठार झाला आहे. तर बसमधील २२ प्रवाशी जखमी झाले. ही दुर्घटना शिक्रापूर नजीक रविवारी (दि. १०) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.

Shiv Subrahmanyam : अभिनेते शिवकुमार सुब्रमण्यम यांचे निधन, काही दिवसांपूर्वी झाले होते मुलाचे निधन
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूरजवळ एका कार चालकाने त्याची कार नगर रस्त्यावर घेतली. याच वेळी पुण्याहून नगरच्या दिशेने जात असणाऱ्या एका कारला वाचविण्याच्या नादात ही खासगी बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेल रॉयल पॅलेसला धडक देत, पार्क केलेल्या कारवर जाऊन आदळली. या अपघातात स्विफ्ट कारचा चालक विशाल बबन सासवडे (रा. शिक्रापूर) हा जागीच ठार झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये खासगी बसमधील एकूण 22 जण जखमी झाले असून पाच जण गंभीर जखमी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *