वारकऱ्यांच्या गाडीला अपघात; १२ जण जखमी
तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथून पंढरपूरकडे येत असलेल्या भाविकांच्या पिक-अप वाहनाला वेळापूर-पंढरपूर रोडवर पिराची कुरोली येथे आज (मंगळवार) सकाळी अपघात झाला. वाहनाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. त्यामध्ये 12 वारकरी जखमी झाले असून, 4 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमी वारकऱ्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आले आहे.