उन्हात डोळ्यांची अशी घ्या काळजी…!
मार्च, एप्रिल, मे महिना म्हटला की उन्ह हे आलेच. आणि उन्हाळा सुरु झाला की आपल्याला डोळ्यांच्या बऱ्याच समस्या जाणवतात. (Eye Care) डोळे रखरखणे, डोळ्यातुन पाणी येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, डोळे कोरडे होणे, डोळ्यांना सुज येणे अशा बऱ्याच प्रकारच्या समस्या या दिवसात आपल्याला जाणवतात. डोळे हा आपला असा नाजूक अवयव आहे त्याला जपणे आणि त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. उन्ह्याळ्यात उन्हाबरोबर धुळीचाही परिणाम आपल्या डोेळ्यांना होत असतो. पण डोळ्यांची योग्यवेळी काळजी घेतली की डोळ्यांचा या समस्या जाणवणार नाहीत.
अशी घ्या डोळ्यांची काळजी
उन्हात बाहेर जाताना चांगल्या गॉगलचा वापर करा. गॉगलमुळे उन्ह आणि धुळीपासुन डोळ्यांचा बचाव होतो.
डोळे दिवसातुन दोन ते तीनवेळा थंड पाण्याने धुवा.डोळ्यांना हात लावण्यापुर्वी ते स्वच्छ धुवा. आणि डोळ्यांना वारंवार हात लावू नका.
भर उन्हात बाहेर पडताय तर छत्रीचा वापर जरुर करा. किंवा डोक्यावर स्कार्प, रुमाल घ्यावा. जेणेकरुन उन्हाचा त्रास होणार नाही
तुम्ही जर लेन्स वापरत असाल तर गॉगल वापरा.
आहार नियमित आणि सकस घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, गाजर, ताजे फळे यांचा प्रमाण जास्त असावे.
डोळ्यांना काही त्रास होत असेल तर त्वरीत नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
वर्षातून किमान दोनवेळा नेत्ररोग तज्ज्ञांकडून तपासणी करुन घ्यावा.
कोकम, वाळा, सब्जा असे पित्तनाशक पदार्थांचे सेवन करावे.
महिलांनी चेहऱ्यावर मेकअप करताना ते डोळ्यात जाणार याची काळजी घ्यावी.
.