सलमानच्या घराबाहेर संजय दत्तचा धिंगाणा

अभिनेता संजय दत्त आणि त्याच्यासोबतचे सर्व किस्से एकामागून एक समोर येण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याचं व्यक्तीमत्त्वं खऱ्या अर्थानं जगासमोर येतं. एक अभिनेता म्हणून संजूबाबाला सर्वांनीच पाहिला. पण, एक व्यक्ती म्हणून तो ज्यांना ज्यांना कळला, त्यांनीच त्याला खरं ओळखलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. (Sanjay Dutt Salman khan)

संजूबाबा कला जगतातील कलाकारांशी मैत्री जपण्यासाठीसुद्धा ओळखला जातो. पण, तुम्हाला माहितीये का, जे लोक चांगल्या मैत्रीसाठी ओळखले जातात ते त्यांच्या संतापासाठीही तितकेच लक्ष वेधतात.

संजय दत्तसुद्धा त्यांच्यापैकीच एक. अभिनेता सलमान खान याच्याशी संजूबाबाची खास मैत्री. दोघांच्याही कुटुंबाचेही घनिष्ठ संबंध. कलाजगतामध्ये दोघंही आपापल्या वाटांनी जात होते. पण, एक वेळ अशी आली जेव्हा सलमानची कमाई संजूबाबाला मागे टाकून गेली. तिथं सलमान काहींना आपली दबंगगिरी करण्यास सुरुवात झाली आणि याचा फटका संजय दत्तच्याच निकटवर्तीयांना बसला होता.

संजूबाबाला याची कुणकूण लागली आणि त्यानं तडक सलमानचं घर गाठलं. दम है तो बाहर निकल, अशा शब्दांत त्यानं मोठ्या आवेगात आवाज दिला. यावेळी तो सलमानच्या अंगावर कधीही धावून जाईल अशीच परिस्थिती उदभवली होती. पण, तो प्रसग निभावून गेला आणि पुढे या दोघांचं मैत्रीचं नातं काही काळानंतर पूर्ववत झालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *