धोनीचा मास्टरस्ट्रोक ठरला निर्णायक

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) या आयपीएलमध्ये कॅप्टनसी करत नाहीय. हा सिझन सुरू होण्याच्या दोन दिवस आधी त्यानं चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) कॅप्टनसी रविंद्र जडेजाला देण्याचा निर्णय घेतला. धोनीला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टनपैकी एक मानले जाते. त्याच्या कॅप्टनसीमध्ये सीएसकेनं 4 वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. धोनीनं त्याची मैदानातील हुशारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) विरूद्ध झालेल्या मॅचमध्येही दाखवली आहे. या मॅचमध्ये धोनीच्या एका चालीमुळे विराट कोहलीची (Virat Kohli) विकेट सीएसकेला मिळाली. धोनीच्या मास्टरस्ट्रोकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चेन्नईनं पहिल्यांदा बॅटींग करत आरसीबीला 217 रनचे टार्गेट दिले होते. या टार्गेटचा पाठलाग करताना आरसीबीची सुरूवात खराब झाली. कॅप्टन फाफ डुप्लेसिस लवकर आऊट झाला. त्यानंतर आरसीबीच्या इनिंगची जबाबदारी विराट कोहलीवर होती. चेन्नईला स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यासाठी विराटला लवकर आऊट करणे आवश्यक होते. विराट मैदनात जास्त काळ राहिला असता तर कदाचित मॅचचा निकाल वेगळा लागला होता. यावेळी धोनीनं त्याची चाल खेळली.आरसीबीच्या इनिंगमधील पाचवी ओव्हर टाकण्यासाठी मुकेश चौधरी आला त्यावेळी धोनीनं अचानक फाईन लेगला उभ्या असलेल्या शिवम दुबेला डीप स्केयर लेगला जाण्यासाठी सांगितले. मुकेशनं पहिला बॉल थोडा शॉर्ट टाकला. विराटनं त्यावर मारलेला बॉल थेट शिवम दुबेच्या हातामध्ये गेला. धोनीच्या या चालीमुळे विराट कोहली फक्त 1 रन काढून आऊट झाला. धोनीनं फिल्डिंगमध्ये केलेला बदल विराटची विकेट घेण्यात निर्णायक ठरला.आरसीबीविरुद्धच्या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या सीएसकेने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 216 रन केल्या. शिवम दुबेने (Shivam Dube) 46 बॉलमध्ये नाबाद 95 रन केले, यात 5 फोर आणि 8 सिक्सचा समावेश होता. उथप्पाने (Robin Uthappa) 50 बॉलमध्ये 88 रनची खेळी केली.
आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 193 रन करता आले. मॅक्सवेलने 11 बॉलमध्ये 26, शाहबाज अहमदने 27 बॉलमध्ये 41, सुयश प्रभुदेसाईने 18 बॉलमध्ये 34 आणि दिनेश कार्तिकने 14 बॉलमध्ये 34 रनची खेळी केली, पण तरीही आरसीबीला या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *