मंत्री मुश्रीफ यांनी ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे दाखवून दिले

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीदरम्यान ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सकाळी आठ वाजता विचारेमाळ येथील मतदान केंद्राबाहेरील (Polling station) बूथजवळ रस्त्यातच पालकमंत्री सतेज पाटील यांचे 50 व्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन अभीष्टचिंतन केले. मंत्री मुश्रीफ यांनी पालकमंत्री पाटील यांना मिठीत घेत ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे दाखवून दिले.

यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी सदर बाजार, लाईन बाजार, कसबा बावडा, राजाराम साखर कारखाना केंद्र, कनाननगर, सिद्धार्थनगर, मंगळवार पेठ, पद्माराजे हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल येथील मतदान केंद्रांना (Polling station)व बूथना भेटी देऊन माहिती घेतली. यावेळी पदवीधर आ. अरुण लाड, आ. जयंत आसगावकर, माजी महापौर आर. के पवार, वंदना बुचडे, सागर चव्हाण, माजी नगरसेवक बाबा पार्टे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रविकिरण इंगवले, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, उत्तम कोराने, पिंटू राऊत, बाळ मेढेकर, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा जहिदा मुजावर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *