आईच्या प्रियकराकडून तरुणीवर अत्याचार
आईच्या प्रियकराने तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे, इंदोरी तसेच भंडारा डोंगराच्या जंगलात 2014 ते 11 एप्रिल 2022 या कालावधीत घडली. जनार्दन सोमाजी शितोळे (40, रा. बहुळ, ता. मावळ), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने सोमवारी (दि. 11) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शितोळे हा फिर्यादी तरुणीच्या आईचा प्रियकर आहे. त्याचे फिर्यादीच्या घरी येणे-जाणे असते.
फिर्यादी तरुणी अल्पवयीन असल्यापासून आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच, फिर्यादी तरुणीची आई व बहीण यांना मारून टाकण्याची धमकी दिली.
दरम्यान, आरोपीने सोमवारी (दि. 11) रात्री दीडच्या सुमारास पुन्हा फिर्यादी तरुणीवर जबरदस्ती केली. वारंवार होणार्या या त्रासाला कंटाळून तरुणीने आईला याबाबत सांगितले. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिस करीत आहेत.