विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा.. CBSE परिक्षेची हॉल तिकीटं जारी
सीबीएसई बोर्डाची 10 वी आणि 12वीची परीक्षा टर्म 2 करिता 26 एप्रिल 2022 पासून सुरु होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाकडून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी CBSE term 2 चे Admit Cards जारी करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना आपली हॉल तिकीट्स सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वरून डाऊनलोड करता येणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती या वेबसाईटवर मिळणार आहे
परीक्षेसाठी नुकतीच सीबीएसई बोर्डाकडून खास नियमावली जारी करण्यात आली आहे. 10वीची परीक्षा 24 मे 2022 दिवशी संपणार तर 12वीचा शेवटचा पेपर 15 जून 2022 दिवशी आहे. देशभरात विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईट वरून Admit Card डाऊनलोड करावं लागणार आहे.
Admit Card डाऊनलोड करण्यासाठी खालील प्रक्रिया जाणून घ्या
CBSE ची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in ला भेट द्या.
होम पेज वर e-PAREEKSHA वर क्लिक करा.
आता ओपन झालेल्या नव्या पेज वर ‘Admit Card/Centre Material for Examination 2021-2022’ option वर क्लिक करा.
तुमचा User Id, Password आणि Security Pin टाकून लॉगिन करा.
10वी,12वीची CBSE Term 2 admit card आता तुम्हंला स्क्रिन वर दिसतील.
हॉलतिकीट डाउनलोड करा. त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा.