आजपासून शेगांवचे श्री संत गजानन महाराज मंदिर सर्वसामान्यां साठी खुले
कोरोना काळानंतर आज प्रथम संत श्री गजानन महाराजांचे मंदिर सर्वांसाठी मंदिर खुले करण्यात आलंय.त्यामुळे शेगावात आजपासून भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. तर कोरोना काळानंतर आज मंदिर खुलं होण्याचा पहिलाच दिवस असल्याने भाविकांची शेगावात सकाळपासूनच गर्दी होत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ई पास लागत होती, आणि कोरोनांचे नियम पाळून दर्शन होते, मात्र आजपासून मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आल्याने पासची आवश्यकता नाहीय. आणि थेट मंदिरात प्रवेश मिळत आहे. मंदिर प्रशासनाकडून ही दर्शनासाठी येणारऱ्या भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्द करून दिल्या आहेत.. पोलिसांची सुरक्षा सुद्धा तैनात आहे.तब्बल दोन वर्षांच्या कोरोना व लॉक डाउन कलखंडानंतर आज शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर पूर्णपणे निर्बंधमुक दर्शनासाठी खुल करण्यात आलंय , आज सकाळी निर्बंधामुक्त व कुठल्याही पास शिवाय दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे. दोन वर्षानंतर सामान्य भक्तांना आज मंदिरात प्रवेश मिळत असल्याने भक्तांमध्य आनंदाचं वातावरण आहे.