इंदुरीकर महाराजांच्या गाडीला अपघात; चालक जखमी
कीर्तनकार हभप निवृती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या स्कार्पिओ गाडीला परतूर – वाटूर रोडवर (बुधवार) रात्री अपघात झाला. या अपघातात गाडीचे चालक संजय गायकवाड (वय 40) हे जखमी झाले असून, महाराजांसह बाकी सहकार्यांना कोणतीही इजा झाली नाही.
सातारा पोलिसांना आज अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा मिळणार
परतूर येथील अग्रवाल पेट्रोल पंपासमोर ट्रॅक्टर ट्रॉलीने स्कॉर्पिओ गाडीला धडक दिली. या घटनेनंतर इंदुरीकर महाराज दुसर्या वाहनाने खांडवीवाडी येथे कीर्तनासाठी रवाना झाले. जखमी चालक गायकवाड यास परतूर येथील डॉ. सत्यानंद कराड यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विनोदी तसेच मार्मिक शब्द आणि त्यांच्या खास शैलीमुळे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला महाराष्ट्रभर मोठी गर्दी होते. याआधी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर कोरोनाकाळात इंदुरीकर महाराजांनी १ लाखाचा निधी दिला होता. इतकंच नाही तर त्यांनी लाॅकडाऊनच्या काळात संगमनेर तालुक्यातील कुटुंबाची होणारी उपासमार लक्षात घेऊन ओझर, रहिमपूर, कोकणगाव, वडगापान येथे गरीब कुटुंबाना धान्याचे वाटप केले होते.