‘कोल्हापूर रन मॅरेथॉन’ मेडल – टी शर्टचे अनावरण

लोकराजा राजर्षी शाहूकालीन क्रीडा परंपरेला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याबरोबर नवोदित खेळाडू घडविणाच्या उद्देशाने ‘वायू डाईनटेक अँप’ प्रस्तूत व ‘एस. जे. आर. टायर्स’ सहकार्याने कोल्हापूर स्पोर्टस् क्लब (केएससी) व रगेडियन क्लब यांच्या वतीने आयोजित ‘कोल्हापूर अल्ट्रा रन मॅरेथॉन’ दि. 24 एप्रिल रोजी पोलिस मैदानावर होत आहे. मॅरेथॉनसाठीच्या मेडल व टी-शर्टचे अनावरण हॉटेल 24 के येथे मान्यवरांच्या हस्ते नुकतेच झाले.

मॅरेथॉन फिटनेससाठी पोषक
बिझनेसबरोबरच फिटनेसकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच ‘फिट इंडिया हिट इंडिया’ या ध्येयासाठी धावणे गरजेचे आहे. यासाठीच मॅरेथॉनला आम्ही सहकार्य करत आहे. कोल्हापूर सर्वच गोष्टीत पुढे आहे, मात्र ऑलिम्पिकसारख्या खेळात कोल्हापूर कमी पडत असल्याचे दिसते. त्याद़ृष्टीने अशा प्रकारच्या मॅरेथॉन खेळाडूंना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. याचसाठी क्रीडानगरी कोल्हापुरात होत असलेल्या अल्ट्रा रन मॅरेथॉनमध्ये आम्ही आमचा सक्रिय सहभाग नोंदवत आहे. यापुढेही कायमच आमचे सहकार्य राहील, अशा भावना संजय भोकरे, राजेश करंदीकर, सिद्धार्थ बन्सल, हिराकांत पाटील, राजेंद्र मांडवकर या मान्यवरांनी व्यक्त केल्या.स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ‘वायू डाईनटेक अँप’ व ‘एस.जे.आर. टायर’ हे आहेत. तर दैनिक ‘पुढारी’ हे स्पर्धेचे असोसिएट पार्टनर आहेत. सहप्रायोजक ब्लोमिंग बड्स पब्लिक स्कूल, एचपी हॉस्पिटॅलिटी, इंडो काऊंट इंडस्ट्रीज लि., माख, रेमंड लक्झरी कॉटन, डीकॅथलॉन, स्वस्तिक कन्स्ट्रक्शन, कोल्हापूर टूरिझम, जे.के. ग्रुप, आयनॉक्स, धनश्री पब्लिसिटी आदी आहेत. टोमॅटो एफ. एम. रेडिओ पार्टनर आणि बी. न्यूज मीडिया पार्टनर आहेत.

नावनोंदणी व अधिक माहितीसाठी
मॅरेथॉनच्या त्वरित नाव नोंदणीसाठी ‘रगेड कब किड्स फिटनेस अ‍ॅकॅडमी’, तावडे लॉन मेमोरियल चर्चच्या मागे, सासने ग्राऊंड येथे दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी www.kolhapurrun.com या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा 7776981548 / 7722067477 या मोबाईल क्रमांकावर संपर्क हा साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *