मोठी बातमी! आता कॉलेजच्या परीक्षांमध्येही मिळणार Extra वेळ
ऑनलाईन शिक्षण सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला होता. मात्र दोन वर्षांनंतर थेट ऑफलाईन परीक्षा देताना वेळ वाढवून द्यावी ही मागणी विद्यार्थ्यांकडून (student) येत होती. परीक्षांसाठी राज्य सरकार तर्फे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरु आहे. मात्र आता काही दिवसांआधी राज्यातील सर्व युनिव्हर्सिटी कॅम्पस आणि सर्व कॉलेजेस सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे परीक्षाही ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहेत. या परीक्षांमध्ये आता विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे .
विद्यार्थ्यांना (student) ऑफलाईन परीक्षांमध्ये पंधरा मिनिटं प्रति तास इतका अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. यासंबंधीची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. स्वतः ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.