पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला हा निर्णय
पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. सलग आठव्या दिवशी इंधन दर ‘जैसे थे’च राहिल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
तेलाची मागणी घटणार?; ओपेकने घटवला यंदाचा जागतिक मागणीचा अंदाज, रशियाचे युद्ध कारणीभूत
मुंबईत आज गुरुवारी एक लीटर पेट्रोलचा भाव १२०.५१ रुपये इतका आहे. दिल्लीत पेट्रोल १०५.४१ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ११५.०८ रुपये इतका असून चेन्नईत पेट्रोलचा भाव ११०.८९ रुपये इतका आहे.
सराफा उद्योगाला चालना; जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनात झाली कोट्यवधींची उलाढाल
मुंबईत आज गुरुवारी एक लीटर डिझेलचा १०४.७७ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत डिझेल ९६.६७ रुपये इतके आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर १००.९८ रुपये इतका असून कोलकात्यात डिझेलचा भाव ९९.८२ रुपये झाला आहे. इंधन दरवाढीचा भडका उडाल्याने ओला आणि उबर या कंपन्यांनी भाडेवाढ केली आहे. त्यापाठोपाठ रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीचे संकट कायम आहे.
एलआयसी आयपीओ; केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय, गुंतवणूकदारांचा होणार फायदा
कमॉडिटी बाजारात आज गुरुवारी ब्रेंट क्रूडचा भाव १०८.३८ डॉलर इतका वाढला. त्यात ३८ सेंट्सची घसरण झाली. यूएस डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १०३ डाॅलर इतका असून त्यात ५८ सेंट्सची घसरण झाली आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादल्याने जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम जागतिक कमाॅडिटी बाजारावर दिसून आल्याचे कमाॅडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे