रणबीरचं लग्न ठरताचं ‘ही’ अभिनेत्री का मागतेय त्याच्याकडून 1 कोटी रुपये?
(entertenment news) सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा सुरु आहे ती म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नाची. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रणबीर आणि आलियाने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दोन्ही कुटुंबामध्ये लग्नाची तयारी सुरू आहे. आलियासोबत लग्न ठरताचं रणबीरकडून एक अभिनेत्री तब्बल 1 कोटी रुपये मागत आहे.
रणबीरकडे 1 कोटी रुपये मागणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून राखी सावंत आहे. सध्या राखीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. फोटोग्राफर्स राखीला विचारतात, ‘लग्नात रणबीरचे बूट कोण लपवणार?’
यावर राखी म्हणते, ‘आलिया मी लपवणार रणबीरचे बूट… त्यासाठी मी 1 कोटी रुपये घेईल…’ सध्या रखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान आलिया आणि रणबीरच्या लग्नाबद्दल मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी म्हणजे आज दुपारी 2 वाजता आलिया भट्टच्या मेहंदीचं फंक्शन सुरू होणार आहे. त्यांच्या वांद्रे येथील घरी हा कार्यक्रम होणार आहे. (entertenment news)
उद्या दोघांचं लग्न होणार आहे. उद्या शुभ मुहूर्तावर दुपारी 3 वाजता रणबीर आणि आलिया लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले आहे.