करिश्मा कपूरने शेअर केले मेहंदी सोहळ्याचे Inside फोटो
(entertenment news) अखेर तो दिवस आलाचं… अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेते रणबीर कपूर यांचं आज लग्न आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आलिया-रणबीर त्यांच्या नात्याला नवीन नाव देण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या सर्वत्र त्यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. बुधवारी सोशल मीडियावर फक्त आणि फक्त आलिया-रणबीरच्या लग्नाची चर्चा होती. चाहत्यांचा अनेक दिवसांपासून एकचं प्रश्न होता, तो म्हणजे आलिया आणि रणबीरचं कधी लग्न होणार?
अखेर आज तो दिवस आला. आलिया-रणबीरच्या लग्नासाठी खास बंदोबस्त करण्यात आला आहे. आलिया नवरीच्या रुपात कशी दिसते? तिला नवरीच्या रुपात सर्वांना पाहायचं आहे. पण अद्याप आलिाया आणि रणबीरचा एकही फोटो समोर आलेला नाही.
पण रणबीरची बहीण आणि अभिनेत्री करिश्मा कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मेहंदीचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये करिश्माच्या पायावरची मेहंदी दिसत आहे. (entertenment news)
फोटो पोस्ट करत तिने ‘I Love Mehndi…’ असं लिहिलं आहे. सध्या तिचा हा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. पण चाहत्यांच्या आलिया आणि रणबीरच्या फोटोंची प्रतीक्षा आहे.
सांगायचं झालं तर, आज शुभ मुहूर्तावर दुपारी 3 वाजता रणबीर आणि आलिया लग्न बंधनात अडकणार. लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले आहे.