कॅप्टन रोहित शर्माला सलग पाचव्या पराभवासोबत आणखी एक मोठा धक्का
आयपीएलचा पंधरावा हंगाम मुंबई टीमसाठी म्हणावा तेवढा चांगला ठरला नाही. आयपीएलमध्ये 5 ट्रॉफी जिंकलेल्या मुंबई टीमला पंधराव्या हंगामात एकही सामना जिंकण्यात यश आलं नाही. आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
नुकत्याच झालेल्या पंजाब विरुद्धच्या सामन्यात मुंबईला 12 धावांनी पराभव स्वीकारण्याची वेळ आली. त्यासोबत कॅप्टन रोहित शर्माला एक मोठा धक्का बसला आहे. पराभवाचं दु:ख सोबत असतानाच लाखो रुपयांचा दंड भरावा लागला आहे.
आयपीएल 2022 मध्ये स्लो ओव्हर रेटसाठी कॅप्टन रोहित शर्माला पुन्हा एकदा दंड ठोठावण्यात आला. ही मुंबईला दंड बसण्याची दुसरी वेळ आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स पुन्हा स्लो ओव्हर रेटचा बळी ठरला, त्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला
पंजाब टीमने 20 ओव्हरमध्ये 198 धावा 5 गडी गमावून केल्या. मुंबई टीम या लक्ष्याचा पाठलाग करण्यात थोडी कमी पडली. 9 गडी गमावून त्यांनी 186 धावा केल्या.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यातही मुंबई टीमला स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाख रुपयांचा दंड भरावा लागला होता. आता पंजाब विरुद्ध सामन्यात पुन्हा एकदा रोहितला स्लो ओव्हर रेटसाठी दंड भरावा लागला आहे. कर्णधार रोहित शर्माला 24 लाख रुपयांचा दंड भरावा लागला.
इतर सदस्यांना 6 लाख रुपये दंज आणि मॅच फीमधून 25 टक्के फी कापून घेतली जाणार आहे. नियमाचं दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यानं ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.