राज ठाकरेंच्या एका भूमिकेमुळे मनसेला गळती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया आल्या. राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले असतानाच ही भूमिका मनसेला अडचणीची ठरताना दिसत आहे. कारण, राज ठाकरेंनी घेतलेल्या या भूमिकेनंतर राज्यभरातील विविध विभागातील मनसे कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम (MNS Karyakarta resign from party) करण्यास सुरुवात केली आहे.मनसेने मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधातील भूमिकेनंतर मुंबई आणि मराठवाड्यातील एकूण 35 कार्यकर्त्यांनी पक्षाला राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर एका मागे एक मनसेतील मुस्लिम कार्यकर्ते पक्ष सोडत असल्याने याचा काहीसा फटका आगामी मनपा निवडणुकांत बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशीद वरती भोंगे लावले तर समोर हनुमान चालीस लावा असे सांगितल्यानंतर अनेक ठिकाणी मनसे हनुमान चालीस लावले. मात्र, राज ठाकरेंनी केलेल्या या विधानानंतर पुण्यातील मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुण्यातील माझीद अमीन शेख हे मनसेच्या वॉर्ड क्रमांक 84 शाखेचे अध्यक्ष आहेत. अमीन शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून बेरोजगारी, महागाई, शिक्षण यासारखे विषय असताना हे मुद्दे सोडून जात-धर्म या विषयांवर भर दिला जात आहे, या कारणास्तव मी राजीनामा देत आहे असं अमीन शेख यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.
वसंत मोरेंना शहराध्यक्षपदावरून हटवलं
अजानसाठी मशिदींवरील भोंग्यांवर आक्षेप घेत हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता. पण, पक्षातूनच त्यांच्या भूमिकाला विरोध झाला. पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी विरोध दर्शवला म्हणून आता त्यांना बाहेरच रस्ता दाखवला आहे. पुणे शहराध्यक्षपदी आता नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची निवड केली आहे. राज ठाकरेंच्या निर्णयामुळे मनसेत खळबळ उडाली.
राज ठाकरे म्हणाले होते, 3 तारखेला ईद आहे, माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे. आम्हाला कोणतीही दंगल, तेढ निर्माण करायचा नाही. राज्याचे स्वास्थ बिघडवायचे नाही. आज 12 तारीख आहे, 12 ते 3 मेपर्यंत सगळ्या मौलवींशी बोलून घ्या, त्यांना समजावून सांगा, भोंगे काढून घ्या, 3 मेनंतर आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही.
भोंगे काढण्यासाठी केसेस अंगावर आल्या तर घेऊ. प्रार्थना करायची तर घरात करा. सणवार असेल तर ठीक. 365 दिवस भोंगे चालणार नाही. आता फक्त हनुमान चालीसा सांगतोय, पुढचा बाण काढायला लावू नका.
18 जुलै 2005 चा सुप्रीम हायकोर्टाचा निकाल आहे. कोणतेही मोठे वाद्य वाजवू नका. जर सुप्रीम कोर्टाने सांगितले असेल तर राज्य सरकारकडून अंमलबजावणी का होणार नाही. आम्ही हातावर हात ठेवून का बसायचे. जे हिंदू माझं भाषण ऐकत असतील तर 3 मेपर्यंत जर यांनी भोंगे उतरवले नाही तर प्रत्येक मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा. त्यांनाही कळू द्या त्रास काय असतो. एकमेकांना त्रास देणे हा धर्म असू शकत नाही, असंही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.
भोंगे काढण्यासाठी केसेस अंगावर आल्या तर घेऊ, प्रार्थना करायची तर घरात करा, सणवार असेल तर ठीक पण 365 दिवस भोंगे चालणार नाही आता फक्त हनुमान चालीसा सांगतोय,पुढचा बाण काढायला लावू नका, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.