अंड खाताना पिवळा भाग काढून खाताय? तर तुम्ही फार मोठी चूक करताय!
अंडं हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे याची प्रत्येकाला माहिती आहे. अंड (egg) हे प्रोटीन्सचा एक चांगला स्रोत मानली जाते. पण, तुम्ही पाहिलं असेल की अनेकजणं फिटनेसकडे लक्ष देत अंड्याचा आतला पिवळा भाग म्हणजेच बलक काढून फक्त पांढरा भाग खातात. कदाचित तुम्हीही असं करत असाल. मात्र तुम्ही देखील ही गोष्ट करत असाल तर तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने खूप मोठी चूक करताय.
तुम्हाला माहित आहे का असं करणं योग्य नाही? आज आपण पिवळा भाग म्हणजेच अंड्यातील पिवळा बलक शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
दरम्यान, अंड्यातील पिवळ बलक काढून पांढरा भाग खाणाऱ्यांचा असा विश्वास आहे की त्यात कोलेस्टेरॉल जास्त असतं जे शरीरासाठी हानिकारक आहे. मात्र एका अंड्यात 186 मिलीग्राम कोलेस्टेरॉल असतं. अंड्यात कोलेस्टेरॉल असते, पण ते शरीराला तेवढं हानिकारक मानलं जात नाही. आपल्या शरीराला कोलेस्टेरॉलची देखील गरज असते, जे टेस्टोस्टेरॉन बनवतं.
अंड्याच्या (egg) बलकामध्ये भरपूर जीवनसत्त्वं A, D, E, B-12 आणि K सारख्या अनेक गोष्टी असतात. आपल्या शरीराला देखील या सर्व गोष्टींची गरज आहे, जी शरीराच्या संतुलित विकासात खूप महत्वाची आहे. अशा स्थितीत, जर तुम्ही फक्त अंड्याचा पांढरा भाग खात असाल, तर तुम्ही या सर्व पोषक घटकांपासून दूर राहताय. त्यामुळे तुम्ही पिवळा भाग देखील खाल्ला पाहिजे.
दरम्यान अंड्याचा पांढरा भागंही आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि त्यात भरपूर प्रथिनं असतात. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे, जे लोक दर आठवड्याला सात अंडी खातात त्यांना हृदयरोगाचा धोका कमी होतो.
अनेक अहवालांनुसार, अंड्यातील पिवळा बलक हा Cholineचा महत्त्वाचा स्त्रोत आहे, जो मेंदूच्या न्यूरोट्रांसमीटरसाठी फायदेशीर आहे. याशिवाय, गर्भधारणा आणि स्तनपानाच्या दरम्यान Choline शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.