खडसेंनी डागली तोफ, गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा…
दोन-चार लोकांना आत टाकलं असतं तर ही परिस्थिती उद्भवली नसती असा घणाघात राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलाय. जळगावमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपा आणि फडणवीसांवर टिका केली. माझेच पाय धरणारे हात-बोट धरणारे पोरं आज मला शिकवायला लागलेत, पवार साहेबांवर बोलायला लागले याचं मला आश्चर्य वाटतंय.. .असं म्हणत फडणवीसांनी शरद पवार आणि एनसीपी बद्दल केलेल्या ट्वीटला उत्तर दिलं शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांवर होणारी EDची कारवाई , महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत तसंच मुख्यमंत्र्याच्या कुंटुबियांवर देखील झालेल्या कारवाई या सर्वांना उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी , गेल्यावर्षीच जर दोन -चार जणांना आत टाकलं असतं तर ही परिस्थिती उद्भवली नसती. दिलीप वळसे पाटलांनी गृहमंत्रीपदाचा हिसका, इंगा दाखवावा असा घणाघात केलाय.