अर्जून तेंडुलकर करणार पदार्पण?

इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची (MI) 2022 या हंगामात अवस्था बिकट झाली आहे. MI संघाला अजूनही विजयाचे खातेही उघडता आले नाही. मुंबईने आतापर्यंत पाच सामने खेळले असून सर्वांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.मुंबई संघाचा पुढील सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे. या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला संधी मिळू शकते. मुंबई फ्रँचायझीने ट्विटद्वारे हे संकेत दिले आहेत.मुंबई फ्रँचायझीने हॅशटॅगसह अर्जुनचे नाव लिहून ट्विट केले आहे. लखनऊविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईच्या मनात ही योजना सुरू आहे. व्हायरल होत असलेल्या या पोस्टवर अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरनेही कमेंट केली आहे.मुंबई इंडियन्सच्या या ट्विटवर कमेंट करताना सारा तेंडुलकरने मनापासून प्रतिक्रिया दिली आहे. म्हणजेच अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतो हे पाहून सारालाही खूप आनंद झाला तोही आपल्या भावाला खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहे.
अर्जुन तेंडुलकर 22 वर्षीय डाव्या हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत देशांतर्गत स्पर्धेत मुंबईसाठी फक्त दोन टी-२० सामने खेळले असून त्यात त्याने 2 बळी घेतले आहेत. मेगा ऑक्शनमध्ये मुंबई फ्रँचायझीने अर्जुनला 30 लाख रुपयांना विकत घेतले आहे.अर्जुनचे वडील आणि दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सध्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचे मेंटर म्हणून काम पाहत आहे. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे तर मुख्य प्रशिक्षक श्रीलंकेचा महेला जयवर्धने आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *