पडद्यामागच्या सूत्रधारांनी केली शिकस्त

(political news) बदलत्या काळानुसार सर्वच क्षेत्रांत बदल होत आहेत. त्यातून राजकारणदेखील सुटले नाही. सेवा म्हणून पूर्वी राजकारणाकडे पाहिले जायचे. परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाही. मतदार डोळ्यांसमोर ठेवून त्यांना खूश करण्यासाठी जे काही करायला लागेल ते केले जाते. त्यासाठी राबणारी यंत्रणा समोर दिसत असते. परंतु निवडणुकीत पडद्यामागे राबणारीदेखील एक वेगळी यंत्रणा असते. ती कधीही समोर येत नसते; 24 तास ही यंत्रणा निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत राबत असते.

निवडणुकीत पत्रक वाटणे, छोट्या सभा आयोजित करणे, मतदारांना खूश करण्यासाठी विविध मार्गांचा वापर केला जातो. यासाठी अनेक कार्यकर्ते राबत असतात. ते कार्यकर्ते लोकांना दिसत असतात. पदयात्रा, प्रचारफेर्‍या काढण्यासाठी नागरिकांना एकत्र करणारा कार्यकर्ता दिसत असतो. परंतु एखादी सभा कोठे घ्यायची, कोणत्या भागात प्रचारफेरी काढल्यास फायदा होईल तसेच एखाद्या ठिकाणी आपला उमेदवार कमी पडत असेल; तर त्यासाठी तेथील मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी काय करावे लागेल, याचा विचार करणारी एक यंत्रणा संपूर्ण निवडणुकीत पडद्यामागे कार्यरत असते.(political news)

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मनापासून परिश्रम घेतले. परंतु प्रचार यंत्रणा पालकमंत्री सतेज पाटील यांनीच अजिंक्यतारा येथून राबविली. या निवडणुकीत पडद्यामागे नेहमीचे सुनील मोदी, मोहन सालपे, डॉ. महादेव नरके, रमेश रणदिवे, विज्ञान मुंडे व रमेश पुरेकर ही मंडळीदेखील होती.

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यासाठीही पडद्यामागे अनेक हात राबत होते. त्यामध्ये स्वरूप महाडिक आघाडीवर होते. त्यांच्यासोबत अमल महाडिक, शशी कदम, भारत कदम हेदेखील पडद्यामागे राहून काम करत होते. भाजपच्या कोअर टीमचे सदस्यदेखील ठाण मांडून होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *