हे’ ७ पदार्थ खा; दूर होतील दृष्टीदोष
दिवसभर कम्प्युटर स्क्रीन किंवा मोबाईल फोन पाहिल्याने दृष्टी कमकुवत होऊ लागते. याशिवाय वय वाढल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. जर आपण आहारावर अधिक लक्ष दिलं तर दृष्टी निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला काही अशा पदार्थांविषयी सांगणार आहोत, ज्यांचं सेवन केल्याने दृष्टी निकोप राहते.हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोहाची मात्रा असते, ज्यामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते.रोज एक ग्लास गाजराचा रस पिल्याने दृष्टी सुधारते. गाजरामध्ये असलेल्या पोषक तत्वांचा डोळ्याच्या आरोग्यासाठी चांगला फायदा होतो. बदामामध्ये असलेलं व्हिटामिन ई डोळ्यांसाठी फायदेशीर असतं. दृष्टी सुधारण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा बदामाचं दूध अवश्य प्यावे.अंड्यामध्ये अमिनो अॅसिड, प्रोटिन, सल्फर, लैक्टिन, ल्युटिन, सिस्टीन आणि व्हिटामिन B2 असतं. या घटकांमुळे दृष्टी सुधारते.जर तुम्ही मांसाहार करत नसाल तर आपल्या रोजच्या आहारात सोयाबीनचा समावेश करा. यामुळे डोळे निरोगी ठेवण्यास मदत होईल.संत्र्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट्स आणि कैरोटीनॉयड दृष्टी सुधारण्यास मदत करतात.