टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला पुन्हा दुखापत

(sports news) आयपीएलचे सामने अधिक चुरशीचे होत आहेत. आता सामने प्ले ऑफच्या दिशेनं जात असल्याने अटीतटीची स्पर्धा आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 29 व्या सामन्यात एक नव्या कर्णधाराची एन्ट्री झाली. त्याला पाहून सर्वजण हैराण झाले. गुजरात विरुद्ध चेन्नई सामन्यात एका नव्या कर्णधाराची एन्ट्री झाली.

गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला दुखापत झाल्याने तो हा सामना खेळू शकला नाही. आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या चांगल्या फॉर्ममध्ये खेळत असतानाच आता दुखापत झाली. त्यामुळे त्याला टीममधून बाहेर जावं लागलं. सतत होणाऱ्या दुखापतीमुळे आणि खराब फॉर्ममुळे पांड्याने ब्रेक घेतला होता.

आयपीएलमधून पुन्हा तो चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसला. मात्र चेन्नई विरुद्ध सामन्यात तो मैदानात खेळताना दिसला नाही. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

हार्दिकच्या जागी स्पिनर राशीद खानने टीमची धुरा सांभाळली. टॉसवेळी राशीदने सांगितलं की हार्दिकला दुखापत झाली. कंबरेचं दुखणं असल्याने तो खेळू शकत नाही. त्यामुळे आम्ही धोका पत्करला नाही. तो विश्रांती घेत असून कदाचित पुढच्या सामन्यात खेळताना दिसू शकेल असंही राशीद म्हणाला. (sports news)

हार्दिक पांड्याला सतत होणाऱ्या दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर बसण्याची वेळ आली. खराब फॉर्म आणि सतत होणारी दुखापत यामुळे त्याच्यावर अनेक प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. या सगळ्याला उत्तर देण्यासाठी पांड्याने आयपीएलमधून पुन्हा दमदार पुनरागमन केलं. मात्र चेन्नई विरुद्धच्या सामन्याआधीच दुखापत झाली.

पांड्याची दुखापत लक्षात घेता आता टीम इंडियातून टी 20 वर्ल्ड कप खेळण्याची संधी तो गमवणार का याकडे लक्ष आहे. आयपीएलमध्ये अनेक युवा खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे रोहित कोणाला संधी देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *