आरोग्य पेपरफुटी प्रकरण: दहा फरारींचा शोध सुरू
आरोग्य विभाग, म्हाडा तसेच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार पुणे पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर आता दहा फरारींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणात फरार असणार्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरच जेरबंद करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर टाकण्याची पत्नीला ऑफर
या प्रकरणात आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले, आरोग्य विभागाच्या लातूर कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे, अंबजोगाईतील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जोगदंड अशा बड्या अधिकार्यांसह यात सहभाग असणार्या एजंटची साखळी पुणे पोलिसांनी उघडकीस आणली होती. तर, परीक्षा घेणार्या न्यासाचादेखील सहभाग आढळून आला होता. पोलिसांनी राज्यभरात छापासत्र राबवत अनेक एजंटांना अटक केली. या गुन्ह्याचा जलदगतीने तपास करत पोलिसांनी या प्रकरणात पाच हजारांहून अधिक पानांचे दोन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहेत. त्यानंतर आता पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यात या तीन प्रकरणात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. आरोग्य विभागाच्या क आणि ड पेपर फुटीप्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत 31 आरोपींना अटक केली आहे. यात शासकीय तसेच आरोग्य विभागातील अनेकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाशी निगडीत संबंधितांची नावे निष्पन्न झाली असून त्यामध्ये 8 ते 10 संशयित आरोपी आहेत. त्यात बहुतांश एजंट असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.