गरम तेल अंगावर उडाल्यानं अभिनेत्री ऋतुजा बागवे झाली जखमी
मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये ऋतुजा बागवे हिचा देखील समावेश होतो. अभिनयाबरोबरच ऋतुजा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ऋतुजा तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधत असते. ऋतुजानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करत किचनमध्ये काम करताना तिला झालेल्या अपघाताची माहिती दिली. या फोटोंमध्ये तिच्या गळ्यावर आणि हातावर भाजल्याच्या खुणा दिसत आहेत.ऋतुजानं सोशल मीडियावर तिचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ऋतुजाच्या गळ्यावर आणि हातावर भाजल्याचं दिसत आहे. अर्थात हे फोटो शेअर करताना ऋतुजानं तिचा अपघात नेमका कसा झाला याबद्दल काही सांगितलेलं नाही. परंतु स्वयंपाक घरात काही तरी काम करत असताना तापलेलं तेल ऋतुजाच्या हातावर आणि मानेवर उडाल्यानं तिला भाजलं आहे. ऋतुजानं जे फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये जिथं तिला भाजलं आहे तिथं औषध लावल्याचं दिसतं आहे. याचा अर्थ तिला झालेल्या जखमा हळूहळू बऱ्या होत आहेत.