सिक्रेट डेटवर बोलावून तरुणीनं चिरला वैज्ञानिक तरुणाचा गळा

(crime news) लग्नाचा प्रसंग हजारो स्वप्न घेऊन येतो. (marriage) यामुळे मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. प्रत्येकाचा आपल्या लग्नाबाबत स्वप्न असतात. लग्न फक्त वर-वधूच नाही तर परिवाराच्या सर्व लोकांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रसंग असतो. मात्र, लग्नाच्या या मंगलदायी प्रसंगी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

होणाऱ्या नवऱ्याचा कापला गळा

सर्व काही ठरल्यानंतर नववधूने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सरप्राईज (suprise) देण्यासाठी बोलावले आणि त्याचा गळा कापल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर तिने त्याला तिथेच सोडून पळ काढला. ही घटना आंध्रप्रदेशात घडली. या तरुणाचे नाव राम नायडू असे आहे. तो सीएसआयआर या संस्थेत वैज्ञानिक आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विशाखापट्टणमच्या चोदावरम पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली.

तीन चाकू घेतले विकत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम नायडूचे पुष्पा नावाच्या एका तरुणीशी पुढच्या महिन्यात लग्न होणार होते. तिने रामूला जवळच्या एका टेकडीवर बोलावले. जेव्हा हा तरुण तिथे पोहोचला त्यावेळी तिने त्याच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. आरोपी मुलगी ही 22 वर्षांची आहे. तिने शाळा सोडली आहे. तिने या घटनेच्या आधी तीन चाकूही विकत घेतले होते. (crime news)

एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीला रामू नायडूसोबत लग्न करायचे नव्हते. यामुळे तिने त्याला बोलावले. तसेच त्याच्यावर चाकूने वार केले. या तरुणीने आपल्या वडिलांना या लग्नाबाबत विरोध केला होता. मात्र, त्यांनी तिचे म्हणणे ऐकले नाही. या तरुणीचे दुसऱ्या कुणासोबत संबंध आहेत की नाही तसेच ही घटना घडली तेव्ही ती एकटीच होती की आणखी कोणी तिला सहाय्य केले, याचा खुलासा अजून झालेला नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *