दरमाह मिळतील 5000 रुपये, तुम्हीही घेऊ शकता ‘या’ योजनेचा लाभ

केंद्र सरकारकडून देशातील सर्व घटकांसाठी अनेक विशेष योजना (Government Scheme) राबवण्यात येत आहेत. केंद्र सरकारची अशीच एक योजना आहे ज्यात तुम्हाला मासिक 5000 रुपये मिळतील, पण जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला दुप्पट म्हणजेच पूर्ण 10,000 रुपये मिळतील. हे पैसे दर महिन्याला तुमच्या खात्यात जमा होतील. अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme) असे या योजनेचे नाव आहे.

अटल पेन्शन योजनेत तुम्हाला दरमहा पेन्शनची सुविधा दिली जाते. या योजनेत (Government Scheme) पती-पत्नी दोघांनी या सुविधेचा लाभ मिळू शकतो. याशिवाय सरकारच्या या योजनेचा लाभ कोणीही घेऊ शकतो. अटल पेन्शन योजना ही मोदी सरकारची लोकप्रिय योजना आहे, ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1000 ते 5000 रुपयांपर्यंतची रक्कम नागरिकांना दिली जाते. पती-पत्नी दोघांनीही या योजनेत अर्ज केल्यास त्यांना 10,000 रुपयांचा लाभ मिळेल. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने म्हटले आहे की या योजनेअंतर्गत पती आणि पत्नी दोघेही 5000 रुपयांच्या पेन्शन रकमेसाठी अर्ज करू शकतात.

प्रीमियम दरमहा भरावा लागेल

या योजनेत नागरिकांना दरमहा प्रीमियमची रक्कम भरावी लागते. अर्जदार 18 वर्षांचा असल्यास, त्याला दरमहा 210 रुपये प्रीमियम भरावा लागेल. दुसरीकडे हेच पैसे दर तीन महिन्यांनी दिल्यास 626 रुपये आणि सहा महिन्यांत 1239 रुपये द्यावे लागतील. याशिवाय दरमहा 1000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी वयाच्या 18 व्या वर्षी फक्त 42 रुपये द्यावे लागतील.

60 वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास पैसे कोणाला मिळणार?

जर कोणत्याही कारणास्तव नागरिकाचा वयाच्या 60 वर्षापूर्वी मृत्यू झाला तर या अटल पेन्शन योजनेचे पैसे नागरिकाच्या पत्नीला दिले जातील. कोणत्याही कारणास्तव पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाल्यास या पेन्शनचे पैसे नामनिर्देशित नागरिकाला दिले जातील.

तुम्ही यामध्ये मासिक, त्रैमासिक आणि सहामाही गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला वयाच्या 42 वर्षापर्यंत गुंतवणूक करावी लागेल. 42 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 1.04 लाख रुपये असेल. 60 वर्षांनंतर तुम्हाला 5000 रुपये मासिक पेन्शन मिळेल. आयकर कलम 80CCD अंतर्गत, त्याला कर सवलतीचा लाभ मिळतो.

खाते कुठे उघडू शकता

तुम्ही सदस्याच्या नावाने फक्त 1 खाते उघडू शकता. या योजनेत तुम्ही बँकेतून खाते उघडू शकता. पहिल्या 5 वर्षांसाठी योगदानाची रक्कमही सरकार देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *