13 वर्षांच्या मुलीवर 10 जणांचा बलात्कार!

(crime news) देशातील मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका तेरा वर्षांच्या मुलीवर तब्बल दहा जणांनी बलात्कार (Raped on minor girl) केला. या घटनेनं एकच संताप व्यक्त केला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रातच (Maharashtra Crime) ही घटना घडलीय. महाराष्ट्रातील कर्जत तालुक्यात ही घटना घडली. या खळबळजनक घटनेनंतर पोलिसांनी सर्व संशयित आरोपींना अटक केली असून गुन्हाही दाखल केला आहे.

बलात्काराची घटनेआधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (Instagram) पीडित मुलीसोबत मैत्री करण्यात आली होती. त्यानंतर या मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी या पीडितेला दिली आणि या त्यानंतर मुलीसोबत संपातजनक कृत्य केलाचा प्रकार उघडकीस आला. ही संतापजनक घटना कर्जत तालुक्यातील गौरकामत गावात घडली आहे. या घटनेनं संपूर्ण गावही हादरुन गेलंय. सध्या पोलिसांनी संशयितांना अटक केली असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठी सुनावण्यात आली आहे.

13 वर्षीय मुलीसोबत गैरकृत्य

कर्जत तालुक्यातील गौरकामत गावामध्ये एक 13 वर्षांची मुलगी राहते. या मुलीचं इन्स्टाग्रामवर अकाऊंट होतं. तिच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या शाळेतील मुलांनी मैत्री केली. इन्स्टाग्रावर मैत्री केली. त्यानंतर काही तरुणांनी या मुलीसोबत लज्जास्पद कृत्य केलंय.

इन्स्टाग्रामवर मैत्री केल्यानंतर काही तरुणांनी पीडित मुलीला कपडे काढून दाखवायला लावले. त्यानंतर इन्स्टाग्राम अकांऊटंच्या स्क्रीनवर येणाऱ्या मुलीच्या फोटोंगं रॅकॉर्डिंग केलं. हे रेकॉर्डिंग इतरांमध्ये व्हायरल करण्यात आलं. गौरकामत गावातील आठ जण आणि शिरसे, जंभिवली गावातील प्रत्येक एक, असा एकूण दहा जणांना पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतलं. त्यानंतर अटक करुन कोर्टातही हजर करण्यात आलं. यानंतर कोर्टानं या सर्वांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आङे. (crime news)

धमकावत बलात्कार…

अटक करण्यात आलेल्या तरुणांनी या मुलीला तुझे अश्लील फोटो व्हायरल करु अशी धमकी देत, तिचं लैगिंक शोषण केलं. लैंगिक अत्याचार झालेल्या या मुलीनं अखेर हा सगळा प्रकार पोलिसात जाऊन सांगितला. लैंगिक अत्याचारानं असह्य झालेल्या पीडित मुलीची तक्रार घेतल्यानंतर पोलिसांनीही तातडीनं पावलं उचलली. काही जणांना तत्काळ ताब्यात घेण्यात आलं. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन घेतला असून आता अधिक तपास केला जातो आहे. दरम्यान, या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित केला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *