शिवसेनेला पुन्हा संघर्ष करावा लागणार
(political news) शिवसेनेने भाजपला सोडले… हिंदुत्व सोडलेले नाही, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले असले; तरी कोल्हापुरातील हिंदुत्व मानणार्या कार्यकर्त्यांची मते ही भाजपच्या पारड्यात पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कारण, या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊनही एकूण मिळालेली मते पाहता त्यांच्या मतांत केवळ 2.23 टक्के वाढ झाली. तर स्वतंत्रपणे निवडणूक लढवलेल्या भाजपच्या मतांत 22 टक्के इतकी मोठी वाढ झाली आहे.
कोल्हापूर उत्तर शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला; पण पक्षप्रमुखांचा आदेश व महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिवसैनिकांनी हा मतदारसंघ काँग्रेसला बहाल केल्याने शिवसेनेला पुन्हा आपले वर्चस्व निर्माण करताना बराच राजकीय संघर्ष करावा लागणार आहे.
आ. चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मध्यावधी निवडणुका लागल्या. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळावी म्हणून शिवसेनेनेही आग्रह धरला. त्यामुळे नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत संभ्रम होता. काँग्रेसने महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांचे नाव निश्चित केले. दुसरीकडे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळा, असे सांगत माजी आ. क्षीरसागर यांना महाविकास आघाडीच्?या उमेदवाराचा प्रचार करण्?यास सांगितले. शिवसैनिकही कामाला लागले. (political news)
भाजपने प्रचार करताना कडवा शिवसैनिक जो हिंदुत्व मानणारा आहे तो काँग्रेसला मतदान करणार नाही. हिंदुत्व हे त्यांच्या रक्तातच आहे, त्यामुळे शिवसेनेची मते भाजपला मिळणार, असे सांगितले. मतदानाच्या दोन दिवस अगोदर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. भाजपच्या आरोपाला उत्तर देताना ठाकरे यांनी शिवसेनेने भाजपला सोडले, हिंदुत्व सोडलेले नाही, असे सांगितले.
हाच संदर्भ घेतला तर हिंदुत्व मानणार्या शिवसेनेची मते भाजपला पडली की महाविकास आघाडीला हा चर्चेचा विषय ठरला आहे. 2019 ला काँग्रेस उमेदवार चंद्रकांत जाधव यांना 91 हजार 053 मते मिळाली . शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर यांना 75 हजार 854 मते मिळाली. तेव्हा भाजपने अपेक्षीत साथ दिली नसल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. 2022 च्या निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तिनही पक्ष एकत्र आले. पण 2019 च्या निवडणूकीच्या तुलनेत या तीनही पक्षांचा मतदानात केवळ 2.23 टक्के वाढ झाली आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला. पण भाजपने घेतलेली मतांची गरूड झेप ही दुर्लक्षून चालणार नाही. त्यांना मिळालेली मते ही शिवसेनेची नसतीलही. हिंदुत्ववादी कार्यकर्ता जर हिंदुत्व मानणार्या पक्षासोबत राहीला असेल तर या निवडणूकीत तो भाजप सोबत राहीला असणार म्हणूनच त्यांच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे बालले जात आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेनेला पुन्हा हिंदुत्वाचा मुद्या घेवून मते मागताना संघर्ष करावा लागणार आहे.