महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक प्रदेशात वादळी पाऊसाने एंट्री केली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. दरम्यान, आता येत्या दोन दिवस राज्यात वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे.
21 ते 23 एप्रिलला काही ठिकाणी हलका किंवा गडगडाट पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा (alert) देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 21 ते 24 एप्रिल दरम्यान तुरळक पण विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. वातावरणातील बदलांमुळे आणि वादळी वाऱ्याच्या इशाऱ्याने (alert) कोकणतील आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे. सध्या जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण दिसत आहे. या कालावधीत नागरिकांनी बाहेर जाण्यासाठी प्रशासनाने खबरदारी बाळगण्याचे आवाहन केलं आहे.
दरम्यान, वादळाच्या प्रभावामुळे समुद्र खवळलेला असून गुरुवारपर्यंत तो खवळलेलाच राहणार आहे. दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात मागील काही दिवसांत हालक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. यात कोकणाचा आणि पश्चिम महाराष्ट्रासह काही प्रदेशांचा समावेश आहे. ऐन कडक उन्हाळ्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या अंदाजानुसार राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊसाच्या हलक्या सरी सुरु आहेत. प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.