‘या’ चिमुरडीचा सलमानला लागला लळा…

सलमान खान ज्या पार्टीत असेल तिथं चर्चा तर सलमानची होणारच. बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीत सलमान खानसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी सलमान एका चिमुरडीसोबत मस्ती करताना दिसला.

लग्न झालं नसलं तरी सलमान मात्र अनेक वेळा लहान मुलांसोबत मस्ती करताना दिसतो. कधी बहीण अर्पिताची मुलं असो किंवा मग सेटवर सहकलाकारांची.

अनेक वेळा लहान मुलांसोबत मस्ती करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरून सलमानला लहान मुलांसोबत रमायला आवडतं हे अनेकदा दिसून आलं आहे.

काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीत सलमान अशाच एका चिमुरडीसोबत मस्ती करताना दिसला. ही चिमुरडी म्हणजे अभिनेता जय भानुशालीची मुलगी तारा.

पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेल्या क्यूट आणि इवल्याशा तारासोबत सलमान खेळताना दिसला. सलमान तिला हसवण्याचा प्रयत्न करत असल्याचं फोटोमधून दिसत आहे.

इफ्तार पार्टीत अनेक सेलिब्रिटी होते मात्र सलमान तारासोबत गप्पा मारण्यात रमला होता. सर्वच पार्टीत चर्चा सलमानची असते मात्र या पार्टीत तारा भाव खाऊन गेल्याचं दिसलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *