धक्कादायक! बापाने केली पोटच्या मुलीची विक्री
(crime news) नागपूर (Nagpur) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या पोटच्या मुलीची वडिलांनी विक्री (daughter sold by father) केली. इतकेच नाही तर मुलीची विक्री करुन मिळालेल्या पैशांतून वडिलांनी बाईक आणि म्युझिक सिस्टम खरेदी केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे एकच संताप व्यक्त कऱण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत संबंधित मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या महिलेलाही अटक करण्यात आली आहे.
दोन महिन्यांच्या चिमुकलीची विक्री
वडिलांनी दोन महिन्याच्या मुलीची विक्री करून बाईक, म्युझिक सिस्टीम खरेदी केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. उत्कर्ष दहिवले असे अटक करण्यात आलेल्या वडिलांचे नाव आहे. तर उषा सहारे असे अटकेतील मध्यस्थी करणाऱ्या महिला आरोपीचे नाव आहे.
आरोपी उषा ही रामटेकमधील खाजगी अनाथ आश्रममध्ये काम करते. उत्कर्ष नळफिटिंगचे काम करतो. उत्कर्षने 1 लाख रुपयांत मुलीला विकले. मुलीच्या विक्रीला उत्कर्ष याच्या पत्नीचा विरोध होता मात्र ही बाब कुणाला सांगितली जीवे मारण्याची धमकी त्याने पत्नीला दिली होती. त्यामुळे मुलीच्या आईचा नाईलाज झाला. अखेर 15 एप्रिलला मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठत पतीने आपल्या दोन महिन्याच्या मुलीची विक्री केल्याचे सांगितले. (crime news)
या प्रकरणी उषा नावाच्या महिलेने मध्यस्थी केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मुलीची विक्री केल्यानंतर उत्कर्षला सत्तर हजार रुपये मिळाले तर उषा नावाच्या मध्यस्थी करणाऱ्या आरोपी महिला 30 हजार रुपये मिळाले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केल्यानंतर आरोपी वडिलांनी मुलीची विक्री करून काही पैशाची दारू प्यायला. तर काही पैशात दुचाकी, म्युझिक सिस्टम आणि दिवाण अशा ऐशोआरामच्या वस्तू खरेदी केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जावयाने आपल्या सासऱ्याची धारदार चाकूने निर्घृण हत्या केली आहे. कपड्याच्या दुकानात शिरुन जावयाने सासऱ्याला चाकूने भोसकलं. या घटनेत सासऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.