सामना जिंकल्यानंतर Rishabh Pant हैराण करणारं वक्तव्य
(sports news) आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये कोरोनाची एन्ट्री झाली आहे. असं असतानाही सामन्यांवर याचा परिणाम झालेला नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या टीममध्ये 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. या परिस्थितीतही बुधवारी पंजाब किंग्स आणि दिल्ली यांच्यात सामना झाला. या सामन्यात दिल्लीने 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.
दरम्यान सामन्यानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टीमच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली आहे. पंत म्हणाला, सहाजिकच आम्ही सगळे गोंधळलेलो कारण आम्हाला सकाळीच समजलं की टीममधील खेळाडू पॉझिटीव्ह आहे.”
पंत पुढे म्हणाला, त्यावेळी टीममध्ये थोडा संभ्रम होता आणि भीती होती. पण आम्ही टीम मीटिंगमध्ये बोललो आणि आम्ही कशावर लक्ष केंद्रित करू शकतो हे समजावून सांगितलं.
टॉस जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. त्यानंतर पंजाब किंग्जची सुरुवात फार खराब झाले. पंजाब किंग्ज अवघ्या 115 रन्समध्ये ऑल आऊट झाली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला केवळ 116 रन्सचं लक्ष्य मिळालं.
यंदाच्या आयपीएलमधील हे लक्ष्य आतापर्यंतचे सर्वात कमी रन्सचं लक्ष्य होतं. दिल्ली कॅपिटल्सला ही धावसंख्या गाठायला अधिक वेळ लागला नाही. दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष्य ९ विकेट्स राखून पूर्ण केलं. दिल्ली कॅपिटल्सने केवळ पृथ्वी शॉची विकेट गमावली आणि सामना जिंकला. (sports news)