तुमच्या ‘या’ सवयी तुम्हाला लवकर म्हातारं बनवतायत, त्या आजच बदला

सुंदर आणि तरुण दिसायला कोणाला आवडत नाही. पुरुष असो किंवा महिला सर्वजण आपण सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे क्रिम, होम रेमीडी आणि बरंच काही करतात. काही लोक तासनतास पार्लरमध्ये घालवतात. परंतु असे असले तरी, त्वचेवरती विशेष चमक येत नाही. यामागचं कारण आहे तुमचा हलगर्जीपणा. बाहेरील रुप हे काही काळापूर्तच टिकतं. त्यासाठी खरी आवशकता असते ती, तुमच्या त्वचेला आतुन सुंदर आणि हेल्दी होण्याची.

जर तुमची त्वचा देखील वेळेपूर्वी चमक गमावत असेल आणि त्वचेवर (skin) सुरकुत्या दिसू लागल्या असतील, तर यामागील कारण तुमच्या काही वाईट सवयी असू शकतात ज्या बदलल्या पाहिजेत. तरच तुमची त्वचा चांगली होऊ शकते.

या 6 वाईट सवयींमुळे त्वचा म्हातारी होते, त्या सवयी कोणत्या आहेत, हे जाणून घेऊ

पाणी कमी प्या

जर तुम्ही कमी पाणी पित असाल, तर ही सवय बदला. कारण चेहरा तरुण आणि आकर्षक ठेवण्यासाठी पाणी उपयुक्त आहे. एका व्यक्तीने दिवसातून २ ते ३ लिटर पाणी प्यायला हवे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. असे केल्यास तुमची त्वचा वयाच्या आधी म्हातारी होणार नाही.

झोपेचा अभाव

त्वचेशी (skin) संबंधित समस्यांचे सर्वात मोठे कारण म्हणजे झोप न लागणे. त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे, चेहऱ्यावर सूज आणि रेषा दिसू लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही आठ तासांची झोप पूर्ण केली पाहिजे, जेणेकरून तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहिल.

धूम्रपानाची सवय

डॉक्टरांच्या मते, सिगारेट किंवा अल्कोहोल जास्त पिण्याची सवय देखील तुम्हाला म्हातारे बनवू शकते. या सवयींमुळे तुमची फुफ्फुस आणि हृदय कमकुवत होते, ज्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. तसेच यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.

जंक फूड

आजकाल लोकांना जंक फूड खूप आवडते. अशा परिस्थितीत लोक घरचे जेवण खाण्याऐवजी बाहेरूनच मागवतात. जंक फूडमुळे आपल्या शरीराला आवश्यक ते पोषण मिळत नाही, त्यामुळे आपले शरीर अशक्त आणि वृद्ध होऊ लागते.

मिठाई जास्त खाणे

मिठाईच्या अतिसेवनाचाही तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत तुम्ही गोड खाण्याची सवय बदलली पाहिजे.

त्वचेच्या काळजीचा अभाव

त्वचा वेळेपूर्वी वृद्ध दिसते, कारण तुम्ही तुमच्या चेहऱ्याची काळजी घेत नाही, जसे की चेहऱ्याला मॉइश्चरायझिंग न करणे, मसाज न देणे इत्यादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *