5-12 वयोगटातल्या मुलांना लवकरच Corona ची लस?
दोन महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या कोरोनानं (Corona Virus) पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची (corona patients) संख्या वाढताना दिसतेय. राजधानी दिल्लीत (Delhi) कोरोनानं विद्यार्थ्यांभोवती विळखा घातला आहे. याच पार्श्वभूमीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. आज लहान मुलांच्या लसीकरणाबाबत (Vaccination) निर्णय घेण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पॉझिटिव्ह संख्यांचा वाढता आलेख पाहता ही बैठक होणार आहे. DCGI ची विषय अपेक्षा समिती 5-12 वयोगटातील मुलांमधील डेटा/कॉर्बेवॅक्सच्या वापरावर चर्चा करण्यासाठी आज बैठक घेईल. आज दुपारी 12 एसईसीची बैठक होणार आहे.
2 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (Seram Institute of India) विकसित केलेले कोवोवॅक्स ट्रायल दरम्यान 2 ते 6 वयोगटातील 230 मुलांना देण्यात आलं. या मुलांना Covovax चा पहिला डोस (first dose) आधीच मिळाला होता. या मुलांना Covovax चा दुसरा डोस 21 दिवसांनी दिला गेला. कोवोवॅक्सची ट्रायल मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल. यानंतर 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोवोवॅक्स लस दिली जाईल.
देशाच्या विविध भागांतील 10 रुग्णालयांमध्ये ट्रायलदरम्यान या मुलांना कोवोवॅक्स लस देण्यात आली. कोवोवॅक्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, देशातील 10 रुग्णालयांमध्ये ट्रायल दरम्यान 230 सर्वात लहान मुलांना ही लस (Vaccination) देण्यात आली आहे. भारतात कोवोवॅक्सची ही एडवांस ह्युमन ट्रायल आहे.
प्रोटिन आधारित लस
किशोरवयीन मुलांवरील ट्रायलच्या सर्व पॅरामीटर्सवर सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतर, सीरम इन्स्टिट्यूटनं 2 ते 6 वर्षांच्या मुलांवर ट्रायल सुरू केली आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, आम्ही प्रथम किशोरवयीन मुलांवर याची ट्रायल केली. त्यानंतर 7 ते 11 वर्षांच्या मुलांवर ही ट्रायल करण्यात आली आणि आता 2 ते 6 वर्षांच्या मुलांवर ही ट्रायल केली जात आहे. या मुलांवर पुढील सहा महिने लक्ष ठेवण्यात येणार आहे.