30 रुपयांची बचत करुन बनू शकता कोट्यधीश
पंधरा प्रश्नांची उत्तरे दिली आणि कोट्यधीश बनलं इतकं सोपं प्रत्येकासाठी नसतं. मात्र कोट्यधीश बनण्यासाठी कोणता शॉर्टकट देखील नाही. मात्र पैशांचा योग्य वापर आणि सिस्टमेटिक इनवेस्टमेंट (SIP) करुन तुम्ही करोडपती बनू शकता. तुम्ही रोज काही पैसे वाचवून योग्य प्रकारे ते गुंतवले (Investment) तर काही वर्षांनी मोठा फंड तयार होऊ शकतो.
वॉरेन बफे यांनी वयाच्या 11 व्या वर्षापासून शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक सुरु केली होती. अशा सिस्टमेटिक इनवेस्टमेंटमुळेत वॉरेन बफे आज जगातील श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहेत. त्यामुळे तुम्हीही आज योग्य गुंतवणूक सुरु केली तर फायदा होईल, याबद्दल माहिती घेऊयात.
रोज 30 रुपये वाचवून बनू शकता कोट्यधीश
जर तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षापासून रोज 30 रुपयांची बचत केली आणि ती योग्यरित्या 60 वर्षापर्यंत गुंतवले तर तुम्ही कोट्यधीश बनू शकता. रोज 30 रुपये वाचवून तुमची महिन्याला 900 रुपयांची बचत होईल. आता हे 900 रुपये दर महिन्याला सिस्टमॅटिक इनवेस्ट करावे लागतील. म्हणजे तुम्ही दर महिन्याला 900 रुपये वर्ष गुंतवले तर त्यावर सरासरी 12.5 टक्के परतावा मिळेल. तुमचं वय जास्त असेल तर तुम्हाला जास्त पैसे SIP करावे लागतील.
RD मध्येही करु शकता गुंतवणूक
तुम्ही दर महिन्याला 5500 रुपये जरी गुंतवणूक (Investment) केली तरी तुम्ही कोट्यधीश बनू शकता. जर तुम्हाला या गुंतवणुकीवर 9 टक्के व्याद मिळाले तरी तुम्ही 30 वर्षात करोडपती बनू शकता. तसेच 25 वर्षात जर तुम्हाला कोट्यधीश बनायचं असेल तर तुम्हाला दर महिन्याला 9000 रुपये गुंतवावे लागतील. तर 20 वर्षात एक कोटींची फंड उभारण्यासाठी दर महिन्याला 15 हजार रुपये गुंतवावे लागतील.
डिविडेंड रिइन्वेस्टमेंट प्लान देखील चांगला पर्याय
जर तुम्हाला 40 वर्ष जास्त वाटत असतील तर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये डिविडेंड प्लान (DRIP)मध्ये गुंतवणूक करु शकता. यात तुम्हाला 12 ते 15 टक्के रिटर्न मिळू शकतो.