धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार?

(sports news) क्रिकेटमध्ये फिनिशर म्हटलं की सर्वांच्या तोंडात महेंद्रसिंग धोनीचं नाव येतं. कालच्या सामन्यात धोनीने अगदी शेवटच्या बॉलवर चौकार मारत चेन्नईला विजयाच्या वाटेवर आणलं. यापूर्वीही अनेक सामन्यांमध्ये धोनीने उत्तर फिनीशरची भूमिका बजावली आहे. दरम्यान त्याच्या या खेळीनंतर त्याने निवृत्तीतून कमबॅक करावं अशी मागणी केली जातेय.

धोनीचा सहकारी आणि टीम इंडियाचा माजी गोलंदाज आरपीसिंगने धोनीकडे ही मागणी केली आहे. आरपीसिंगच्या या मागणीवर धोनी आता काय उत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.

आरपी सिंहची सोशल मीडियावर पोस्ट

आरपी सिंहने सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. यामध्ये त्याने त्याचा आणि धोनीचा एक फोटो पोस्ट केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने म्हटलंय की, आपण माहीला टी-20 वर्ल्डकपसाठी निवृत्तीचा विचार सोडण्यासाठी आग्रह धरू शकतो का? (sports news)

2020 मध्ये होणारा टी-20 वर्ल्डकप खेळायचा असल्याची इच्छा वर्तवली होती. मात्र कोरोनामुळे हा वर्ल्डकप पुढे ढकलण्यात आला होता. ज्यानंतर काही दिवसांनी धोनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *