प्रेमप्रकारणाचा झाला भयावह शेवट

(crime news) प्रियकरामुळे एका विवाहित महिलेने स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (woman suicide attempt) आग लागल्यानंतर या महिलेने वाचवण्यासाठी आरडाओरड करत विनंती केली. यानंतर तिच्या घरच्यांनी ही आग विझवली. मात्र, तोपर्यंत ही महिला खूप जास्त प्रमाणात भाजली गेली होती. यानंतर या महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काय आहे नेमके प्रकरण?

माहितीनुसार, ही घटना बिहाच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असणाऱ्या बारुण गावातील आहे. या महिलेचे लग्न तीन वर्षांपूर्वी झाले होते. तिला मूलबाळ झाले नाही. याचदरम्यान, या विवाहित महिलेचे आपल्या गावातील एका तरुणासोबत सूत जुळले. (married woman affair) यानंतर ती महिला तिच्या पतीला सोडून या तरुण प्रियकरासोबत आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहू लागली. मात्र, हे प्रकरण फारच पुढे गेले.

बुधवारी रात्री ही विवाहित महिला आपल्या तरुण प्रियकरासोबत पकडली गेली. याच विषयावरुन तिचे आपल्या पतीसोबत भांडण झाले. यानंतर या महिलेने आणि तिच्या प्रियकराने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण गुरुवारी सकाळी पंचायतमध्येही गेले. यानंतर ही महिला घरी गेली आणि तिन स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकत पेटवून घेतले. यानंतर या महिलेल्या जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. (crime news)

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी सुरू केली. या महिलेच्या प्रेम प्रकरणाची चौकशी सुरू आहे. महिलेचा जबाब नोंदवल्यानंतर आणखी माहिती स्पष्ट होणार आहे. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *