कर्णधार रोहित शर्माकडून मॅच फिक्सिंग?
(sports news) आयपीएलच्या कालच्या सामन्यात देखील मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. आयपीएलची एल क्लासिको मानली जाणारी चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध मुंबई इंडियन्स यांची लढत अखेर चेन्नईने जिंकली. चेन्नईने 3 विकेट्सने मुंबईचा पराभव करत यंदाच्या सिझनमधील दुसरा विजय नोंदवला आहे.
दरम्यान या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होतोय. कालच्या सामन्यात रोहितला भोपळाही फोडता आला नाही. यावरून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होतेय. अशातच एका युझरने रोहित शर्माने मॅच फिक्स केली असल्याचं पोस्ट केलं आहे.
ट्विटर युजर्सने मीम्सद्वारे रोहितवर केली टीका
ट्विटरवर रोहित शर्माला ट्रोल करताना एका युझरने, पुढच्या सामन्यात रोहित शर्मालाच बेंचवर बसला असं ट्विट केलं केलं आहे. तर दुसऱ्या एका युझरने थेट, रोहित शर्मा मॅच फिक्सर आहे, असं लिहिलंय.
यावेळी काही युझरने रोहितने कोहलीला कॉपी केल्याचं म्हटलंय. यासंदर्भात मीम शेअर करत विराट कोहलीन शून्यावर आऊट झाल्यावर पुढच्या सामन्यात रोहित शर्मा आणि इशान किशनची रिएक्शन कशी असेल याबाबत मीम्स शेअर केल्या आहेत.
मुंबईने आतापर्यंत एकूण 7 सामने गमावले आहेत. तर मुंबई इंडियन्सच्या या सध्याच्या परिस्थितीला रोहित शर्मा आणि इशान किशन जबाबदार असल्याचं काही युझर्सने म्हटलं आहे. (sports news)
मुंबई इंडिन्सने चेन्नई सुपर किंग्सला 156 रन्सचं आव्हान दिलं होतं. चेन्नईकडून अंबाती रायडुने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तर रॉबिन उथप्पाने 30 रन्सचं योगदान दिलं. धोनीने निर्णायक क्षणी 28 धावांची नाबाद विजयी खेळी साकारली. तर प्रिटोरियसने नाबाद 22 धावा करत धोनीला चांगली साथ दिली. यामुळे चेन्नईचा विजय निश्चित झाला.