सलमानने पुन्हा दाखवली ‘दबंगगिरी’…; आता सलमान पुन्हा चर्चेत
(entertenment news) बॉलिवूडचा ‘दबंग’ खान म्हणजेच सलमान खान, सलमान हा या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. सलमान आणि वाद हे तसं जुनंच समीकरण. आता पुन्हा सलमान चर्चेत आला आहे ते त्याच्या आगामी सिनेमामुळे.
सलमान खानचे सिनेमे हे फक्त त्याच्या नावावर चालतात आणि बक्कळ कमाई करतात. त्यामुळे सलमानच्या सिनेमामधील महत्वाचे निर्णय हे सलमानचेच असतात.
त्याचा आगामी ‘कभी ईद, कभी दिवाली’ हा सिनेमाही त्याच्या एका निर्णयामुळेच चर्चेत आला आहे. या सिनेमाबद्दल सलमानने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्याची इंडस्ट्रीत मोठी चर्चा आहे. सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या सिनेमात सलमानसोबत अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
तसंच या सिनेमात मराठी अभिनेता श्रेयस तळपदेचीही वर्णी लागली होती. सहकलाकाराच्या भूमिकेत श्रेयसचं नाव जवळपास निश्चित झालं होतं मात्र सलमानने श्रेयसला सिनेमातून हटवल्याचं समजतं आहे. (entertenment news)
श्रेयससह अर्षद वारसीसुद्धा या सिनेमात काम करणार होता मात्र सलमानने अर्षदलाही घरचा रस्ता दाखवला आहे. मग या दोघांच्या जागी आपला मेहुणा आयुष शर्मा आणि जहीर इकबालला संधी दिली आहे. सिनेमात हे दोघे सलमानच्या भावाची भूमिका करणार आहेत
सलमानचा हा सिनेमा 30 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाचं शूटिंग मे महिन्यात सुरू होण्याचा अंदाज आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सलमान आणि पूजा हेगडे ही जोडी पडद्यावर झळकणार आहे.