आताची मोठी बातमी! राणा दाम्पत्य माघार घेण्याची शक्यता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udahv Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार करत खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आज सकाळी नऊची वेळ दिली होती. पण ते जाऊ शकले नाही.
मातोश्री बाहेर आणि राणा दाम्पत्यच्या घराबाहेर शिवसैनिकांनी ठिय्या दिला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी राणा दाम्पत्याला घरातच रोखून ठेवलं.
आता राणा दाम्पत्य माघार घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (CM Udhav Thackeray) यांचा मुंबईत दौरा आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राणा दाम्पत्य माघार घेण्याची शक्यता आहे.