लग्न मंडप उभारताना विजेचा धक्का बसून वधूच्‍या पित्याचा मृत्यू

वडवणी तालुक्यातील टोकेवाडी येथील लग्नाचा मंडप उभारताना विद्युत तारेचा धक्का बसून वधूच्या पित्याचा मृत्यू झाला. मुलीला हळद लागल्यानंतर घडलेल्‍या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त हाेत आहे. हनुमंत अंबादास डोंगरे असे मृत्युमुखी पडलेल्या वधू पित्याचे नाव आहे.

कोळसा टंचाईला राज्य सरकारच जबाबदार : रावसाहेब दानवे
याबाबत अधिक माहिती अशी, हनुमंत डोंगरे यांच्या एकुलत्या एक मुलीचा विवाह हिवरापाडी येथील एका मुलाशी ठरला आहे. शुक्रवारी हळदीचा कार्यक्रम झाला. रविवारी (दि. २४) दुपारी विवाह होणार होता. दोन्ही कुटुंबात जय्यत तयारी सुरू होती. सर्व कुटुंब व नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

विवाहाचा मंडप उभारताना मंडपाला विद्युत तारेचा करंट लागला. त्यामुळे मंडपात अँगलजवळ बसलेली व उभे राहिलेल्या ७ ते ८ जणांना विजेचा धक्का बसला. यात काहीजण या धक्क्याने बाजूला फेकले गेले. वधूच्या पित्याला एवढा जबर धक्का बसला की त्‍यांचा जागीच मृत्यू झाला. लग्नाऐवजी मुलीच्या पित्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. या दुर्दैवी घटनेने तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *