लायकीत राहा, राष्ट्रपती राजवटीची धमकी देऊ नका – संजय राऊत
आमच्या घरावर येईन आम्हालाच आव्हान देत असाल तर हा शिवसैनिक खंबीर आहे. त्याला कोणाच्या संरक्षणाची गरज नाही. आव्हान द्याल तर, शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. सीबीआय मागे लावा, ईडी लावा, आम्हाला त्रास द्या आम्हाला काही फरक पडत नाही. तुमच्या लायकीप्रमाणे राहा, राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या धमक्या देऊ नका, असा थेट इशारा शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
मुंबईत येऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही. तुम्हाला राष्ट्रपती राजवट लागू करायचे असेल तर करुन दाखवाच. पोलीस त्यांचे काम करतील. आम्ही आमचे काम करु. आम्हाल धमकी देऊ नका. आमचे शिवसैनिक खंबीर आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली. ते सध्या नागपूर येथे आहेत. दोन दिवसांत या ज्या घटना पाहत आहोत. हा शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक नाही, अजून काहीच सुरुवात झालेली नाही. राणा दाम्पत्य ‘मातोश्री’ला बदनाम करत आहे. तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे वागा. ‘झुंडशाही’ला झुंडशाहीप्रमाणे उत्तर देऊ. महाराष्ट्रात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील. तुम्ही जर आमच्यावर हात उगारायचा प्रयत्न कराल, तर लाखो शिवसैनिक गप्प बसणार नाही. तुम्ही घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हालाही घर आहे हे लक्षात ठेवा. शिवसैनिक मरायला आणि मारायलाही तयार आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
कंबोंज यांच्या गाडीवर झालेला हल्ला एक शिवसैनिक म्हणून बघायला पाहिजे तसाच बघतो. कोणाच्या तरी पाठबळाने आमच्या मातोश्री घुसण्याचा प्रयत्न करत असाल शिवसैनिक काय स्वस्थ बसतील का? सरकारने काय करावे याचे सल्ले मुख्यमंत्र्यांनी एकून घ्यायला महाराष्ट्राला भिकारी पण आले नाही. तुम्ही आमच्या मातोश्री घुसण्याचा प्रयत्न करत आहे, तुमच्या लायकीप्रमाणे राहा, लक्ष्मणरेषा ओलांडली तर शिवसैनिक सुद्धा संतापून तुमच्या घरापर्यंत येणार, आम्हाला राष्ट्रपती राजवट लावण्याच्या धमक्या देऊ नका, लावायची असेल तर लावा. हिम्मत असेल तर राष्ट्रपती राजवट लावा , आम्हाला त्रास द्या आम्ही तुम्हाला घाबरत नाही, शिवसैनिकांवर कोणाचाही कंट्रोल नाही, असे ते म्हणाले.