वांगी येथे ‘पुष्पा’चा धुमाकूळ
वांगी (ता. कडेगाव) येथील गावाच्या दक्षिणेस खरकटवाडी परिसरात चंदन (Sandalwood) चोरीचा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी झाड तोडून नेले आहे.
या परिसरात चंदन चोरीचे प्रकार वारंवार घडत असल्याने या मागील ‘पुष्पा’चा शोध लावून पोलिसांनी त्यास अटक करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. हा चोरीचा प्रकार गुरुवारी (दि. 21) रात्री घडला.
याबाबत अधिक माहिती अशी : गावाच्या दक्षिणेस खरकटवाडी परिसरात विलास शिंदे यांची शेती असून शेताकडेला असणार्या विहिरीवर चंदनाची (Sandalwood) चार झाडे आहेत. यामधील परिपक्व झालेले एक झाड तोडून नेले आहे. उर्वरित कोवळी झाडे तशीच आहेत.