माजी मंत्र्यांच्या निवासस्थानी पोलीस शिपायाची गोळी झाडून आत्महत्या

माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाड्यात तैनात पोलीस शिपायाने गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना आज (दि.२५) सकाळी १० च्या सुमारास घडली. नितेश अशोक भैसारे (वय ३६) असे मृत शिपायाचे नाव आहे.
‘मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर सर्व काही सुरु; ठोकशाहीला उत्तर देण्याची भाजपची तयारी’
नितेश भैसारे अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. आज माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी नितेशची ड्युटी लावण्यात आली होती. ड्युटीवर येताच त्याने आपल्या बंदुकीतून गोळी झाडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
नितेश भैसारे हा मूळ चंद्रपूर येथील रहिवासी असून पत्नी, मुलगा व मुलीसह तो अहेरी येथे वास्तव्य करीत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पोलीस घटनेचा तपास करीत असल्याचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *