जगातील ५ श्रीमंत व्यक्तींच्या यादीत यांचा समावेश
अदानी (Gautam Adani) समुहाचे संचालक गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या वाॅरेन बफे यांनाही अदानी यांनी मागे टाकले आहे. फोर्ब्जच्या यादीनुसार, अदानी हे जगातील ५ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.
गौतम अदानी यांची संपत्ती १२३.२ अब्ज डाॅलर्सवर गेली आहे. जगात फक्त चारच लोक आहे, जे अदानी यांच्यापेक्षा सर्वात श्रीमंत आहेत. त्यात पहिल्या क्रमांकावर टेल्साचे प्रमुख एलन मस्क, अमेझाॅनचे जेफ बेजोस दुसऱ्या क्रमांकावर, एव्हीएमएचेचे बर्नार्ड अलनाॅल्ड आणि फॅमिली आणि मायक्रोसाॅफ्टचे बिल गेट्स हे अनुक्रमे चौथ्या वल पाचव्या क्रमांकावर आहेत. (Gautam Adani)
जगातील श्रीमंत माणसांच्या पहिल्या १० जणांच्या यादीत फक्त मुकेश अंबानी यांचे नाव होते. मात्र, अंबानींना अदानींनी मागे सोडून पाचवं स्थान मिळवलं आहे. फोर्ब्जच्या यादीच मुकेश अंबानी हे आठव्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती ही १०४.२ अब्ज डाॅलर्स इतकी आहे. त्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीला गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्त ठरलेले आहेत
५९ वर्षांच्या गौतम अदानी यांच्या कंपनीचे शेअर्समध्ये १९ टक्क्यांवरून १९५ पर्यंत वाढ झालेली आहे. गौतम अदानी हे अक्षय ऊर्जी, मीडिया, विमानतळांसहीत अनेक क्षेत्रांमध्ये वेगाने विस्तार करत आहेत. कारण या कंपन्यांच्या शेअर्स तेजीत आहेत. ८.९ अब्ज डाॅलर्सपासून १२३.२ अब्ज डाॅलर्सपर्यंत अदानी यांनी संपत्ती मिळवली आहे.