अनुष्कासोबत स्टेडियममध्ये सेलिब्रेशन करणारी ही लकी गर्ल कोण?
एका रात्रीमध्ये प्रसिद्धी मिळाली तर ती कोणाल आवडणार नाही? आपल्या आवडत्या अभिनेत्री किंवा अभिनेत्यासोबत किंवा व्यक्तीसोबत एक संध्याकाळ घालवायला मिळणं लकी समजलं जातं. एका तरुणीला ही संधी मिळाली आणि रातोरात तिला प्रसिद्धी मिळाली.
या तरुणीला बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत मॅच पाहण्याची संधी मिळाली. बंगळुरू विरुद्ध दिल्ली झालेल्या सामन्यात ही तरुणी मॅच पाहायला आली होती. तिला अगदी जवळून अनुष्का शर्माला पाहता आलं. एवढंच नाही तर अनुष्कासोबत तिने सेल्फी देखील घेतला आहे.
या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या तरुणीचं नाव रवीना आहुजा असल्याची माहिती मिळाली आहे. तिने मॅचदरम्यानचा आपला अनुभव शेअर केला